Braces / Clip Full information in Marathi ( दातांच्या पिना बद्दल संपूर्ण माहिती ) Braces india , which braces is good
नमस्कार
हे article खास त्या लोकांसाठी आहे ज्यांना braces लावायचे आहेत पण मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत. तुम्हाला या article मध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटून जाईल.
• Braces काय असतात ??
Braces म्हणजे दाताला लावणारी पिन किंवा क्लिप. ही एक दात उपचार पद्धत आहे ज्यामध्ये दातांना पिन लावून वेडे वाकडे दात सरळ केले जातात. ही एक natural पद्धत आहे ज्यामध्ये काही कालावधी साठी दाताला पिना लावण्यात येतात.
• Braces साठी योग्य वय काय आहे??
Braces हे सगळ्या वयोगटातील व्यक्ती साठी आहे. साधारनता जे Teenager असतात त्यांच्या मध्ये फार दिसायला मिलते. Braces साठी योग्य वय बघितल्यावर असं लक्षात येईल की जेव्हा तोंडामध्ये दोन्ही प्रकारचे दात असतात म्हणजेच की दूध दात आणी मोठे दात. या वयोगटातील कालावधी ला mixed Dentition period असं म्हणतात.
• Braces किती प्रकारचे असतात ??
Braces मध्ये बरेच प्रकार आहेत त्यामध्ये
1 ) metal braces
2) Ceramic braces
3) Self aligned braces
4) Aligner braces
Note: या सगळ्यावर एक विशेष Article मिळेल तुम्हाला.
• Braces / क्लिप बसवल्यावर खूप त्रास होतो का ??
braces हे एक metal पासून बनवलेले असते. पहिल्यांदा जेव्हा क्लिप लावलेली असेल तेव्हा त्या metal चा काही भाग आपल्या ओठांना cut करतो. या लहान cut मुळे तोंडात ulcers ( लहान फोड ) येतात. जे की काही कालावधी नंतर निघून जातात.नवीन braces ची तोंडाला सवय नसते त्यामुळे 2,3 दिवस सवय व्हयला लागतात.braces मुळे ताण निर्माण होतो त्यामुळे starting ला बोलायला थोडा त्रास होईल.
Content:
Which braces are best .
Braces in india.
Braces cost
Type of braces
Ceramic Braces cost
Aligners
• braces बसवण्यासाठी दात पाडणे आवश्यक आहे का ??
दात पाडणे हे एक treatment चा भाग आहे. दातांना पाहिजे त्या ठिकाणी नेण्यासाठी त्या जागेवर space ( रिकामी जागा ) असणे आवश्यक आहे. त्यासाठीच काही cases मध्ये दात पाडावे लागतात.
• Braces ला खर्च किती येतो ??
खूप लोकांना वाटते की braces लावायला बराच खर्च येतो.त्यामुळे कही लोक treatment पासून दूर राहतात. वास्तव मध्ये असं नसते. अंदाजे खर्च बघितला तर 20,000 rs पर्यंत जातो. ही रक्कम ऐकायला मोठी वाटली तरी ही रक्कम तुम्हाला instalment ( हफ्ते ) मध्ये द्यायचे असतात. समजा treatment कालावधी 2 वर्ष असेल तर treatment पूर्ण होई पर्यंत तुम्ही थोडे थोडे पैसे देऊ शकता.
Note: अगदी अल्प दरात treatment पाहिजे असेल तर खाली comment करा.
• Braces treatment ला कालावधी किती लागतो??
ही एक natural आणि हळुवार proces आहे. या मध्ये साधारण 2 वर्ष इतका कालावधी लागू शकतो. कालावधी हा case वर अवलंबून आहे.या पूर्ण treatment मध्ये संयम ठेवणं आवश्यक असते.
• Braces मुळे जेवण करताना त्रास होतो का??
Braces लावल्या नंतर 2 ते 3 दिवस अन्न अडकणे वगैरे असणार पण काही दिवसांनी सवय होऊन जाईल आणी त्यानंतर काहीही त्रास होणार नाही.
•• तुमचे काही प्रश्न असतील तर खाली comment मध्ये विचारू शकता.
लेखक परिचय :
लेखक एक दंत वैद्यकीय अधिकारी आहेत.लोकांपर्यंत दाता संबंधी माहिती पोहचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.
For Free Consultation : comment below
Comments
Post a Comment